Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम .."न्याय आपल्या दारी,...

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम ..”न्याय आपल्या दारी, समाधान आपल्या हाती” या संकल्पनेतून महिलांना दिलासा

यावल दि 29 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम दिनांक 29 जुलै 2025 रोजी कोसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

हा विशेष कार्यक्रम आमदार मा. श्री. अमोल हरीभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. तहसीलदार नाझिरकर मॅडम होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, सुविधा आणि त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले.

शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महिलांना दाखले, योजनांचे मार्गदर्शन, नोंदणी, आधार, जात प्रमाणपत्र, पेंशन योजना आदी सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या.

या उपक्रमामुळे अनेक महिलांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी दीपक गवई यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी करून सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमला पंचायत समिती अधिकारी, कृषी खात्यातील अधिकारी,कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी , आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी , भागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व सर्व ग्रामसेवक व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!