कोपरगाव दि .28 तालुका प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) संपूर्ण माहिती अशी की दिनांक 25 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये धामोरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ झगझाप याच्या दहा हजार रुपये मागणीवरून हा वाद उत्पन्न झाला होता. सदर मारहाणीच्या प्रकाराची कुठल्याही प्रकारे गुन्हा व नोंद पोलीस स्टेशनला दिले नाही. म्हणून घटनेचा निषेध म्हणून बहुजन भीम पॅंथर संघटनेचा निषेध मोर्चा या आरोग्य केंद्र मध्ये आला. महत्त्वाची बाब म्हणजे निवेदन पत्र शासकीय /वैद्यकीय अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा अधिकारी हजर राहिले नाही. निवेदन पत्र घेण्यासाठी एकही अधिकारी नाही त्याच्यामुळे संघटनेचा पारा अजून चढला. सदर डॉक्टरची नियुक्ती आरोग्य केंद्रात झालेले आहे पण त्याला मराठी भाषा बोलता येत नाही. या आरोग्य केंद्र साठी कुठल्याही प्रकारची चांगली सोय नाही असे बहुजन भीम पॅंथरचे संस्थापक मुन्नाभाई शेख यांनी सांगितले. या मोर्चादरम्यान कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे व गुंजाळ दादा हे उपस्थित होते. सदर मोर्चेसाठी श्रीरामपूर टीम, कोपरगाव तालुक्यातील सर्व महिला पुरुष पदाधिकारी कोपरगाव संस्थापक अध्यक्ष सहसचिव भारत चक्रनारायण उत्तर महाराष्ट्र सचिव सतीश साळवे बाबासाहेब उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयश्री भोसले तालुका अध्यक्ष अश्विनी वाघ छाया मोरे अरुणाताई सोनवणे दिलखुश शेख साजिद सय्यद अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुकद्दर खाटीक आत्माराम हिंगमिरे सुरेश मोरे शिवसेना उभाठा गटाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णा भाऊ आहेर एकलव्य संघटनेचे निलेश भाऊ ठाकरे संपूर्ण एकलव्य टीम संपत अलगट साहेब बोधक भोसले यांच्या निदर्शनाखाली शांततेत पार पाडला. वरील विषय घेता आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येथे आदिवासी दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू असे एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष.उत्तमभाऊ पवार यांनी सांगितले.
























