खिर्डी ( प्रतिनिधी ) दि.29 तालुक्यातील खिर्डी ॥ बु ॥ गावातील ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ऐशीतैशी झाली आहे .
सविस्तर वृत्त असे की _रावेर तालुक्यातील खिर्डी ॥ बु ॥ ग्रामपंचायत प्रशासनने गावात महत्वाचे अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परतू ते सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित रित्या फिटिंग न करता धातूर मातुर काम करून लाऊन दिल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे निकृष्ट दर्जाचे तर नाहीत ना ? जर उत्तम क्वॉलिटी चे असते तर अशी अवस्था झाली नसती. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेच्या व शासनाच्या पैश्याचा चुराडा न होता चांगल्या व नामांकित कंपनीचे उत्तम क्वॉलिटी असेल सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित रित्या फिटिंग करून लक्ष पूर्वक बसविण्यात येण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.























