यावल दि . 4 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि. 29 ऑगस्ट रोजी दहिगाव गावच्या बाहेरील विरावली रस्त्यावरील खारवा शिवारात घडलेल्या इमरान युनूस पटेल (वय 21) या तरुणाच्या निघृण खुनाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनंतर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा तीव्र निषेध ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे करण्यात आले असुन यावल पोलिस निरीक्षक धारबडे यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. या प्रकरणात दोन आरोपी पोलिस कोठडीत असले तरी प्रत्यक्षात सहा ते सात जणांनी मिळून खून केल्याचा ठोस संशय असल्याने सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासोबतच मृतक इमरान पटेल यांच्या कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत व तातडीने संरक्षण द्यावे, अशीही मागणी संघटनेने केली. तसेच परिसरातील गुंड प्रवृत्ती व अवैध धंद्यांवर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा पँथर सेनेने दिला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे, युवा उपाध्यक्ष श्रावण भालेराव, तालुका सचिव पवन गाढे, शहर अध्यक्ष आदित्य गजरे, निखिल भालेराव, लकी तानसर आदी मान्यवर उपस्थित होते.























