बारामती, दि. २८ (प्रतिनिधी ) बारामती शहर आणि परिसरात क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून रस्त्यांचे नुकसान करणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर मोठी पोलिस कारवाई करण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव व शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण १४ ट्रक आणि हायवा वाहने जप्त करण्यात आली असून, संबंधित वाहनांवर खटले दाखल करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे पाठवण्यात आले आहेत.
रस्त्यांचे नुकसान, नागरिकांचा धोका
खडी, मुरूम आणि इतर बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन धावत असल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत होती. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने ही कडक कारवाई करण्यात आली.
जप्त वाहनांमध्ये २ ते १० टनांपर्यंत ओव्हरलोड आढळले असून प्रत्येक वाहनावर मोठा दंड आकारला जाणार आहे. ही सर्व वाहने सध्या बारामती वाहतूक शाखेच्या ताब्यात आहेत.
सततची मोहीम आणि जनतेला इशारा
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली असून, यामध्ये पोलीस निरीक्षक सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम आदींनी सहभाग घेतला आहे
गेली अनेक महिन्यांपासून बारामती वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही अपघातांचे प्रमाण चिंतेची बाब आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.”
– गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक
नियम मोडणारे चालक इतरांच्या जिवाला धोका पोहोचवत आहेत. शिस्त आणि सुरक्षिततेसाठीच ही मोहीम सुरू केली आहे.”
– सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
“ओव्हरलोड वाहन म्हणजे इतरांच्या जिवाशी खेळ. ही कारवाई कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच नाही, तर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राही
– चंद्रशेखर यादव, वाहतूक निरीक्षक
























