Homeताज्या बातम्याऐनपुर येथे ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थाच्या पालकांनी वर्गाला ठोकले कुलुप...

ऐनपुर येथे ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थाच्या पालकांनी वर्गाला ठोकले कुलुप…

ऐनपुर प्रतिनिधी ( विजय के अवसरमल ) ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात ऐनपुर येथील ग्रामस्थ एकत्र येऊन ११वी च्या वर्गाला टाळे लावले 

सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये इ. ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थांना बसत आहे ऐनपुर येथील मुलीं व मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी जाऊ नये म्हणून ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात विज्ञान शाखा सुरु करण्यात आलेली आहे परंतु आता ज्या मुलां मुलींसाठी वर्ग सुरु करण्यात आले तेच मुलं व मुली मेरीट लिस्टमुळे प्रवेशापासून वंचित राहत आहेत. प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरु झालेली असून आमची मुले-मुली आता कुठे जातील प्रवेशापासून वंचित राहतील की काय या भीतीने गावातील आई वडील व पालकांनी थेट विद्यालय गाठले व मुख्याध्यापक शिक्षक व संचालक मंडळा कडे आपल्या तक्रारी मांडल्या त्यामध्ये मुला-मुलींच्या काळजीपोटी मोलमजूरी करण्या-या पालकांची अर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी लांब बाहेर गावी पाठवू शकत नाही,त्यांचे शिक्षण 5 वी पासुन याच विद्यालयात झाले आहे त्याला येथेच प्रवेश मिळावा यासाठी सर्व आई वडील व पालक आग्रही झाले आमच्या पाल्यांना इ. ११ वी मध्ये प्रवेश द्या अन्यथा आम्ही 11 वी चा वर्ग उघडु देणार नाही असा इशारा दिला व वर्गाला कुलूप लाऊन त्यांनी संताप व्यक्त केला ,ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर पालकांनी व शिक्षकांनीही रोष व्यक्त केला, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य पी.आर महाजन सर,जी.आर महाजन व पर्यवेक्षक आर.आर.इंगळे मॅडम यांनी विद्यालयात पालक व विद्यार्थी यांची समजुत काढली तसेच आपल्या विद्यालयातून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे व‌ करु असे आश्वासन पालकांना दिले, 

महीला व पालकांनी आम्ही खासदार,आमदार व शिक्षण अधिकारी यांच्याकडे स्वतः जाऊन तक्रार करु असा ठाण मांडला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांनीही आम्ही पण सहकार्य करू असे आश्वासन दिले पालकांना शांत राहण्याचे आव्हान मुख्याध्यापक पी.आर महाजन सर उपमुख्याध्यापक जी.आर.महाजन सर पर्यवेक्षक आर.आर.इंगळे मॅडम यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!