ऐनपुर प्रतिनिधी ( विजय एस अवसरमल ) ऐनपुर येथे डंपर व ट्रॅक्टर द्वारे गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करून लूट केली जात आहे
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ग्रामपंचायत च्या मालकीची सुलवाडी रोड वरील भगवती मंदिर परिसरात गट क्रमांक ४४४ व ४५० हा भुखंड मोठमोठ्या बरड्या असून या बरड्यांचे बऱ्याच दिवसांपासून उत्खनन सुरू आहे काही लोकप्रतिनिधी च्या आशिर्वादाने कंत्राटदार यांच्या मुजोरी ने मोठमोठे डंपर व ट्रॅक्टर द्वारे बाहेर गावी वाहतूक करीत आहेत ग्रामपंचायत ची कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे दादागिरीने कुणालाही न जुमानता वाहतूक करीत आहेत .
ऐनपुर येथे मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय असून यांना सुध्दा ही होणारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर कधी दिसले नाहीत का? का कंत्राटदार व यांचे काही आर्थिक संबंध तर नाही ना? असा नाराजीचा सूर गावकऱ्यांतून निघतांना दिसत आहे ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य यांनी रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे यांना या अवैध गौण खनिज उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक केली जात असल्याबाबत निवेदन दिले असून या निवेदनाला महसूल विभागाने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसत आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध गौण खनिज वाहतूकीकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे उत्खनन करण्यात येणाऱ्या गौण खनिजांचा कुठलाही महसूल महसूल विभाग किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला मिळत नाही मग कोणाच्या परवानगीने हे उत्खनन सुरू आहे यांना गौण खनिज वाहतूकीचा परवाना कोणी दिला? कंत्राटदार याला कोणाचा आशिर्वाद आहे? मंडळ अधिकारी,तलाठी,नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तोंडी तक्रार भरपूर वेळा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत पाणी कुठे मुरते आहे याबाबत ऐनपुर येथील नागरिक सभ्रमात पडले आहे तात्काळ अवैध गौण खनिज वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
























