Homeक्राईमएम.आय.डी.सी. पोलीसांनी कंपनीत चोरी करणारे चोरटे अवघ्या 08 तासांत केले जेरबंद....

एम.आय.डी.सी. पोलीसांनी कंपनीत चोरी करणारे चोरटे अवघ्या 08 तासांत केले जेरबंद….

जळगाव दि . 25 (लक्षवेध न्युज नेटवर्क ).20/07/2025 रोजीचे दुपारी 03.00 वाजेपासुन ते दि.22/07/2025 रोजीचे सकाळी 08.00 वाजेथे सुमारास जळगांव शहरातील एम.आय.डी.सी. व्ही सेक्टर येथील V-193 मधील भोसले इंडस्ट्रीजचे कंपाउंड मधुन सोया पनीर बनविण्याचे मशनरी व पार्टस तसेच हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल असे एकुण 1,15,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने सुरेश रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एम. आय.डी.सी. पो स्टे येथे सिसिटिएनएस नं. 535/2025 अन्वये गुन्हा दाखल आहे.

जळगांव जिल्ह्यामध्ये तसेच एम.आय.डी.सी.पो.स्टे. हद्दीत मोटार सायकल चोरी व कंपनीतील चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणुन आरोपी अटक करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावित, मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीताचा शोध घेणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल तायडे, पोहेकी / गिरिष पाटील, पोकों/राहुल रगडे, पोकों/विशाल कोळी अशांनी सदर भागातील सिसिटिव्ही फुटेज प्राप्त करुन दौन अज्ञात इसम संशयास्पद फिरताना दिसुन आले. पोकों/राहुल रगडे व विशाल कोळी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेवुन त्यांची ओळख पटवुन त्यांना ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी नामे 1) प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे, 2) नितीन उर्फ नित्या रोहीदास चव्हाण, दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी, जळगांव यांना सदर गुन्ह्यात दि.22/07/2025 रोजी अटक करुन मा न्यायालयाने त्यांना दि.25/07/2025 रोजीपावेतो पोलीस कोठडी मंजुर केली आहे. त्यांच्याकडुन PCR दरूयान चोरीस गेलेला 1,15,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों / संजिव मोरे, पोकों / मंदार महाजन हे करित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!