पुणे दि .25 (प्रतिनिधी ) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अखेर दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना दोन महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात खेवलकर यांच्यानर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून अतिशय गंभीर आरोप करण्यात आले होते. अखेर त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
पुण्यातील खराडी भागात एका पार्टीमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांना अंमली पदार्थ आढळले होते. या प्रकरणात प्रांजल खेवलकर हे मुख्य आरोपी होते. या पार्टीत महिलादेखील होत्या. या प्रकरणात अतिशय गंभीर आरोप करण्यात आले होते. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं का? हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या सुनावणीत राहिला. ते गेल्या दोन महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. त्यामुळे पुणे सत्र न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला.
प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्याने त्यांना जेलमधून बाहेर येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. पण आता संध्याकाळ झाली आहे. त्यामुळे न्यायालयाचं पत्र घेऊन कारागृह प्रशासनाला दिलं तरी प्रांजल खेवलकर यांची आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता कमी आहे. प्रांजल खेवलकर यांची आता उद्या जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. पुणे सत्र न्यायालयाने खेलवकर यांना जामीन दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
























