Homeआरोग्यआमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान

आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान

रावेर दि . 28 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. अमोलभाऊ जावळे उपस्थित होते. शिबिरादरम्यान घडलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

शिबिरात गौरव छोटू भालेराव या दिव्यांग युवकाने आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. युवकाची व्यथा ऐकून आमदार जावळे यांनी विलक्षण तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ फैजपूरचे उपविभागीय अधिकारी मा. बबनराव काकडे आणि रावेरचे तहसीलदार मा. बंडू कापसे यांना घटनास्थळी बोलावले.

अधिकार्‍यांनीही आमदारांच्या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही करत निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृत करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. मंजुरी मिळाल्यानंतर स्वतः उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कुंभारखेड्याचे सरपंच भरत बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, कपिल चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी गौरव भालेराव यांच्या घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

या तात्काळ निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थ व लाभार्थ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, “समाधान शिबिर हे केवळ नावापुरते नसून, ते कृतीतून समाधान देणारे ठरत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!