Homeराजकीयआपला दवाखाना घोटाळा प्रकरण — भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन, SIT...

आपला दवाखाना घोटाळा प्रकरण — भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन, SIT चौकशीची मागणी

यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) जळगाव जिल्ह्यातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून, यामागे डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद आहे. दिनांक १५ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्येही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले.

भीम आर्मीने स्पष्ट इशारा दिला की, जर १४ ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनप्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल भाऊ निंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, जिल्हा संघटक हेमराज तायडे, संतोष तायडे, अविनाश लहासे व मुकद्दर तडवी, मोसिम तडवी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!