Homeशिक्षण-प्रशिक्षणआदिवासी संस्कृतीचा जल्लोष मोहंमाडली आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनाचा थाटात उत्सव साजरा

आदिवासी संस्कृतीचा जल्लोष मोहंमाडली आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनाचा थाटात उत्सव साजरा

रावेर दि ९ प्रतिनिधी ( आदित्य गजरे )आदिवासी संस्कृतीचा जल्लोष मोहंमाडली आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनाचा थाटात उत्सव साजरा )  “आदिवासी संस्कृती आमच्या मुळांमध्ये आहे, आणि मुळे जितकी खोल, वृक्ष तितकाच बळकट!” — हाच आत्मा साकारत मोहंमाडली आश्रमशाळेत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या परिसरात अगदी जत्रेसारखी रंगत निर्माण झाली होती. आदिवासी वेशभूषेतील चिमुकल्यांनी आणि युवक-युवतींनी जेव्हा पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सुरू केले, तेव्हा परिसरच भारावून गेला. त्यांच्या पायांच्या ठेक्यावर जमलेली उपस्थिती थक्क झाली.

या कार्यक्रमात लहानग्यांनी आदिवासी संस्कृती, इतिहास, आणि अभिमानावर भाषणे देऊन मन जिंकले. विशेष म्हणजे पारंपरिक दागिने, फेटे, वन्य वस्त्र, आणि रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून सादर केलेली सोंगटी आणि नृत्ये उपस्थितांची मने मोहित करून गेली.कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळा मोहंमाडली चे कर्तबगार मुख्याध्यापक श्री. नितीन भगाळे सर त्या सोबतच माध्यमिक मुखद्यापक श्री .कुमावत सर लाभले होते. आपल्या भाषणातून त्यांनी आदिवासी समाजाच्या शौर्य, संस्कृती आणि शिक्षणावरील भूमिकेला उजाळा दिला. यावेळी पोलीस पाटील रमजान तडवी, तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच उपसंपच कुर्बान तडवी व ग्रामपंचायत सदस्य जाहाबिर तडवी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.या विशेष दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळालाच, पण त्यातून आदिवासी अस्मितेला आणि संस्कृतीला देखील एक सशक्त व्यासपीठ मिळाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोहंमाडली आश्रमशाळेने पुन्हा एकदा सिद्ध केले — आदिवासी परंपरा ही केवळ आठवण नव्हे, ती आमच्या जीवनशैलीचा अभिमान आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!