Homeमहाराष्ट्रआदिवासी व भूमिहीन न्यायासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी व शासनाने वन महसूल...

आदिवासी व भूमिहीन न्यायासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी व शासनाने वन महसूल जमीनी प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पना तूर्त स्थागिती स्थगिती द्या अन्यथा राज्यव्यापी भूमिहीन सत्याग्रह – भाई प्रदीप अंभोरे

मुबंई दि 18 (लक्षवेध न्युज नेटवर्क )  महाराष्ट्र राज्य शासन व प्रशासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात आदिवासी व भूमिहीना साठी दाद मागावी तथा वन व महसूल जमिनी मा सर्वोच्च न्यायालय निर्णय 2011 व 2025 यावर गांभीर्याने विचार करून 1990 पूर्वीचे महसूल आणि 13 डिसें 2005 पूर्वीचे आदिवासी वन जमीन बाबत विचार न केल्यास गत 30 ते 40 वर्षांपासून लाखो कुटुंबियांचे उदरनिर्वाह च साधन त्यांना ते पात्र ठरत असतांनाही त्यांना त्यांचे भूमी हक्क पासून वंचित ठेऊन सदर वन महसूल जमिनी उद्योग पती अंबानी,अदाणी व बडे राजकीय नेते यांच्या हीतसाठी केवळ महाराष्ट्र विकास ही सबब पुढे करून सदर जमिनी वर सौर ऊर्जा प्रकल्प खेळाचे मैदान रुग्णालया बोगस औधोगिक कंपन्या ना विकासाचे शासन निर्णय द्वारा देऊन राज्यातील लाखो बहुजन गोरगरीबवर अन्याय करत आहे. या बाबत शासनाने गांभीर्याने दखल न घेतलतास शासन विरोधात विविध संघटनांना सोबत घेऊन लाखों भूमिहीन रस्त्यावर घेऊन राज्यव्यापी जन सत्याग्रह आंदोलन उभारल्या जाईल असा इशारा भाई प्रदीप अंभोरे संयुक्त संघटना प्रमुख यांनी सत्याग्रह आंदोलन दरम्यान इशारा दिला.मुंबई त भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त संघटनांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदना प्रमाणे भाई प्रदीप अंभोरे यांच्या मार्गदर्शनात भाई प्रदेश नेते भीमराव खरात दिनकरराव घेवंदे भगवान गवई रमेश गाडेकर यांच्या नेतृत्वात सीएसटी मुंबई ते आझाद मैदान पर्यंत सत्याग्रह मोर्चा काढण्यात आला व विदर्भ खान्देश मराठवाडा येथून प्रातिनिधीक शेकडो दलित आदिवासी अल्पसंख्यांक भूमिहीनानी आझाद मैदानात 16,17 जुलै रोजी ला बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकार होश मे आओ वनमंत्री महसूल मंत्री होश मे आओ जमीन पट्टे सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करा शेतकरी, व भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती यावर्षीचे खरीप वन जमिनीवरील उभी पिके उध्वस्त करण्यात येऊ नयेत वनविभाग जळगांव व बुलडाणा बेकायदेशीर कार्यवाहीत आदिवासी उध्वस्त वस्ती मूळ जागेवर वर घरकुल प्रदान करा. जिल्हा उपविभाग व ग्राम वनहक्क समिती प्रलंबित व वनदावेदारांना पेरणी अनुमती आदी मागण्या बाबत शिष्ट मंडळ न दिल्याने आंदोलका नी दुसरे दिवशी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देता च विधानभवनात वन महसूल सचिव यांचे समवेत चर्चा घडून आणली सर्व मागण्या बाबत महसूलमंत्री,वनमंत्री आदिवासी मंत्री यांचे समवेत संबंधीत जिल्हाधिकारी वन महसूल अधिकारी यांची 15 दिवसात संयुक्त बैठक घेऊन मागण्या मार्गी लावण्याचे आश्वसन शिष्ट मंडळास दिल्याने सचिव द्वारे मा.मुख्यमंत्री महसूलमंत्री आदिवासी मंत्री यांना निवेदन सादर केले.यावेळी भाई प्रदीप अंभोरे सह भीमराव खरात भरत मुंडे शांताराम सोनोने अतिश खराटे उपस्थिती होती आंदोलनाचे यशस्वीतेसाठी भूमि मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा संघटनेचे संजय पाटील, गजानन पाटील,कांताराम ससाने,अमोलचोपडे ,गजानन पिंपळकार,दादारावमोरखडे रामसिंग सोळंके सारंगधर टापरे,विश्णु सैरिसे अनिल काळिगे, शिवाजी सावंत नाना तायडे रंजना तायडे सुनील दांडगे ,गौतम तेलगोटे, बाबुराव मंजा . समाधान वाकोडे, प्रदिप वाकोडे रामेश्वर चव्हाण, उषा जाधव सपकाळ ताई ,ताराबाई वाघ ,महिजिदहाकम. गणपत कांबळे,नंदाबाई तायडे, प्यारसिंग पावरा प्रसारम पावरा विष्णू बोरकर, सुभाष बारेला रनदास महाराज समाधान गिरि‌ . ईलायस भाई पठाण उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!