Homeताज्या बातम्याआदिवासी विकासात उल्लेखनीय योगदान ! रावेर तालुक्यातील आश्रम शाळेतील मुकेश कासार यांना...

आदिवासी विकासात उल्लेखनीय योगदान ! रावेर तालुक्यातील आश्रम शाळेतील मुकेश कासार यांना “आदर्श कर्मचारी” पुरस्काराने सन्मानित

रावेर दि .8 (प्रतिनिधी)  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत रावेर तालुक्यातील पाल येथील आश्रम शाळा येथे कार्यरत असलेल्या श्री. मुकेश भास्कर कासार (मदतनीस) यांना त्यांच्या उत्तम कार्याची दखल घेत “शिक्षकेतर आदर्श कर्मचारी पुरस्कार” जाहीर करण्यात आला. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानप्राप्त प्रसंगी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, आदिवासी विकास मंत्री श्री. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद तसेच यावल प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार या मान्यवरांच्या हस्ते श्री. कासार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

श्री. मुकेश कासार हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमशाळेत प्रामाणिकपणे कार्यरत असून, त्यांनी शाळेच्या प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वेळेचे पालन, कागदपत्र व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या शाळेतील गरजांची पूर्तता, तसेच शाळेच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनात त्यांचे योगदान मोठे आहे.

या गौरवप्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंद अत्तरदे, अन्य शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण पाल आश्रमशाळेचा गौरव वाढला असून, रावेर तालुक्यातील आदिवासी शिक्षण व्यवस्थेतील एक आदर्श उदाहरण म्हणून श्री. कासार यांची नोंद झाली आहे.

स्थानिक पातळीवरून ते राज्यस्तरावर सन्मानित झाल्याने रावेर तालुक्यातून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

या प्रसंगी माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, युवा नेतृत्व धनंजय भाऊ चौधरी, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. झांबरे सर, सचिव अजितदादा पाटील, मुख्याध्यापक बी. जी. पारधी, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!