Homeमहाराष्ट्रआदिवासी महिला रस्त्यावरच बाळंतपण ...ही घटना केवळ दुःखद नाही, तर राजकीय अपयशाची...

आदिवासी महिला रस्त्यावरच बाळंतपण …ही घटना केवळ दुःखद नाही, तर राजकीय अपयशाची लाजीरवाणी पातळी – ॲड . प्रकाश आंबेडकर यांची संतप्त प्रतिक्रिया …

जळगाव (प्रतिनिधी ) दि .30 जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात २४वर्षीय संताबाई बारेला या आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. २६ मे रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी, तिला दुचाकीवरून जवळच्या वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना, रस्त्यातच तिची प्रसूती झाली. यावेळी उपस्थित महिलांनी लुगड्याचा आडोसा करून प्रसूती केली आणि आवश्यक साधने नसल्यामुळे दगडाच्या सहाय्याने बाळाची नाळ कापली. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ट्विट करत ते म्हणाले की, ही घटना केवळ दुःखद नाही, तर ही अनेक दशकांच्या राजकीय अपयशाची लाजीरवाणी खालची पातळी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारने विकासाचे कितीही गाजर दाखवले, तरी आदिवासी आणि वंचितांसाठी मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्यात ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही सरकार असो, वंचितांसाठी आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी त्यांनी पिढ्यानपिढ्या फक्त वोट “बँक” बनवली आहे. दवाखाने बनवले नाहीत, फक्त वोट बँक उभी केली ! आज आरोग्य हक्क नसून फक्त घोषणांचं साधन राहिलं आहे. आणि त्याची किंमत कोण चुकवतं? तर वंचित समूह !

ज्यांच्या हाती वैद्यकीय साधने असायला हवीत, त्यांच्या हाती आजही दगड आहेत. हा अपमान फक्त त्या महिलांचा नाही, तर मानवतेचा आहे! लाज वाटावी अशी बाब आहे ही, अशी टीका त्यांनी सरकारच्या अपयशी आरोग्य यंत्रणेवर केली आहे.या हृदयद्रावक घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!