Homeताज्या बातम्याआंबापाणी अंगणवाडी सेविका भरतीत अनियमितता; स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळावा अशी मागणी

आंबापाणी अंगणवाडी सेविका भरतीत अनियमितता; स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळावा अशी मागणी

यावल दि . 12 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील आंबापाणी येथील  अंगणवाडी सेविका पदाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक आदिवासी महिलेला वगळून बाहेरील उमेदवाराची निवड केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

पँथर व भिम आर्मी कार्यकर्ते सतिष अडकमोल यांनी यावल पंचायत समिती एकात्मिक महिला बाल विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरिपूरा येथील उमेदवाराला निवड देताना भरती नियमांचे उल्लंघन करण्यात आले. हरिपूरा येथून निवड झालेल्या महिलेला नियुक्त शाळेमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचे सांगितले जात असले तरी, त्या शाळेतील शिक्षक पदावर कार्यरत असल्याने त्यांचे वास्तव्य गावाबाहेर आहे. तसेच हरिपूरा हे आंबापाणीपासून 14 किलोमीटर अंतरावर असून, रोजचा प्रवास करणे शक्य नसल्याने ही निवड स्थानिक हिताच्या विरोधात असल्याचा आरोप आहे.

गावातील आदिवासी महिलेला या पदासाठी प्राधान्य द्यावे, असा नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली असुन कार्यवाही न झाल्यास व आदिवासी महिलेला न्याय न मिळाल्यास स्वतंत्र दिनी दि. 15 ऑगस्ट रोजी यावल पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सतिष अडकमोल यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

याबाबत महिला बाल विकास अधिकारी अर्चना आटोळे यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसार आंबा पाणी येथील सेविका भरतीची अजून फक्त प्राथमिक यादी लागलेली आहे अंतिम निवड यादी 29 तारखेला लागणार त्या यादीवर जर कुणाची हरकत असेल तर त्यांनी ती रीतसर हरकत लेखी स्वरुपात कार्यालयात देणे आवश्यक आहे त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!