Homeताज्या बातम्याअहिरवाडी ते पाडले, निरूळ ते पाडले रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करण्याची रविंद्र...

अहिरवाडी ते पाडले, निरूळ ते पाडले रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करण्याची रविंद्र रायपुरे यांची मागणी

रावेर दि . 13 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील अहिरवाडी ते पाडले या सुमारे 5 किलोमीटर लांबच्या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसाठी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची पुरेसा रुंदी नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने एका बाजूला थांबूनच परस्पर उलटफेर करावी लागत असून, पावसाळ्यात येताना चिखलाने रस्ते तर अत्यंत खराब झाली आहेत.

तसेच, निरूळ ते पाडले या 2 किलोमीटर रस्त्याची स्थिती देखील तशीच आहे . ह्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत अहिरवाडी या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी तत्कालीन उपसरपंच रवींद्र रायपुरे यांनी मागणी केली आहे ज्यामुळे स्थानिक प्रशासन व जिल्हा विकास समितीने तातडीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त आहे.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, सध्या रस्त्याची खराबस्थिती मुळे रोजच्या वाहनधारकांना व पायी चालण्याच्या वेळी अनेक प्रकारचे अपघात घडू शकतात. त्यामुळे तातडीने या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी आहे .

सरकारी यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर रस्त्याच्या डांबरीकरणाला आणि रुंदीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील रहिवासी सुरक्षितपणे फिरू शकतील तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेचा सुद्धा विकास होईल.

अहिरवाडी ते पाडले व निरूळ ते पाडले या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रावेर -यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी आणि स्थानिक रहिवाशांच्या समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे. तातडीने डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु करून या मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. अशी मागणी पाडले येथील तत्कालीन उपसरपंच रवींद्र रायपुरे यांनी तक्रार निवारण सभेत केली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!