Homeताज्या बातम्याअनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला ऑनलाईन उपलब्ध करावा – बिरसा महासभानचं मागणीपत्र

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला ऑनलाईन उपलब्ध करावा – बिरसा महासभानचं मागणीपत्र

यावल दि .19 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा आदिवासी समाजासाठी महत्त्वाचा कागदपत्र असून तो ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हावा, यासाठी बिरसा महासभान संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष विश्वास प्रेमजी बोरेला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना रहिवासी दाखला मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय फिल्टर, बोरोला, टोकर्कुऱ्हा अशा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जाणूनबुजून बेवजह अडथळे निर्माण करून दाखला देण्यात येत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे आदिवासी बांधवांचे शैक्षणिक, आर्थिक व शासकीय कामकाजात नुकसान होत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने आधीच १६ जून २०२३ रोजी दिलेल्या शासन निर्णयात स्पष्टपणे अनुसूचित क्षेत्रातील रहिवासी दाखला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्यावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात ते पालन होत नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.

संघटनेने पुढे स्पष्ट केले की, जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करताना रहिवासी दाखला आवश्यक असतो. पण तरीही संबंधित कार्यालयांकडून अर्जदारांना वेगवेगळ्या शिफारशी मागितल्या जात आहेत, जे सरळसरळ बेकायदेशीर व असंविधानिक आहे.

निवेदनातून प्रमुख मागण्या:

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला तातडीने ऑनलाईन उपलब्ध करावा.

कोणत्याही प्रकारे जातीय भेदभाव न करता सर्व आदिवासी बांधवांना दाखला द्यावा.

१५ दिवसांच्या आत चुकीचे दाखले दुरुस्त करून नवे दाखले देण्यात यावेत.

सदर निवेदन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्याची प्रत आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई व आयुक्तालय नाशिक येथे पाठविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!