Homeसामाजिकअण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड...

अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी रत्नागिरीचे असलम शेख तर कार्याध्यक्षपदी अहिल्यानगरचे दीपक मोहिते

मुंबई (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 5 संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या अध्यक्षपदी पाडळी केसे तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विश्वास मोहिते यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी रत्नागिरीचे पत्रकार सामाजिक कार्य सक्रिय असणारे असलम शेख यांची तर कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते लोक स्तंभ न्यूज चे संपादक दिपक मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी आयोजित सर्वसाधारण सभेमध्ये या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी बाबासाहेब कांबळे होते. यावेळी कार्यकारिणी मध्ये संपतराव मोहिते कराड, बाबासाहेब कांबळे शिराळा, दिलीप कांबळे वाई, नासिर सय्यद अहिल्यानगर, विकासभैय्या शेलार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख अहिल्यानगर, दिलीप महाजन कराड, निलेश तडाखे कराड यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यावेळी गत वर्षी प्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचे यावेळी ठरवण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकानी 1 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये शालेय साहित्याचे वाटप, नेत्र तपासणी शिबिर, महिला प्रबोधनविषयक कार्यशाळा, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे विविध उपक्रम राबवून ही जयंती साजरी करावी असेही या बैठकीत सर्व मताने ठरविण्यात आले.
नवनियुक्त अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, महापुरुषांनी जात,धर्म, पंथ यापेक्षा प्रबोधनाला महत्त्व दिले, त्यामुळे आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराने जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महापुरुषांचा जातीय सलोखा राखण्याचा विचार खऱ्या अर्थाने प्रसार करणे गरजेचे आहे. कोणत्याही महापुरुषांना अंधश्रद्धा मान्य नव्हती, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन केल्यानंतर त्यांचा अंधश्रद्धेला विरोध होता आणि प्रत्येक पुस्तकातून शिक्षणाला महत्त्व दिल्याचे आपल्याला पहावयास मिळते. त्यामुळे महापुरुषांचे आवश्यक ते विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. असे सांगून विश्वास मोहिते म्हणाले की चौथ्यांदा माझी बिनविरोध निवड करून माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरविन, महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असणारे काम यापुढेही माझ्या हातून कळेल असा विश्वासही यावेळी विश्वास मोहिते यांनी दिला. स्वागत आणि प्रास्ताविक संपतराव मोहिते यांनी केले तर आभार विकास शेलार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!